samastgawalivikassanstha.com

About Us

85%

Sales Growth

120%

Engagement

About Socialzy

गवळी समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

गवळी समाजाच्या ऐतिहासिक वाटचालीकडे पाहिले असता, अनेक सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अडचणींचा सामना करीत गवळी समाजाने स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे.
स्वाभिमान, श्रमशीलता आणि सहकार ही समाजाची मूळ मूल्ये आहेत. परंतु गेल्या काही दशकांत या समाजाला संघटनात्मक विखुरलेपणा, शिक्षणातील मागासलेपण आणि आर्थिक मर्यादा यामुळे मागे राहावे लागले.
या पार्श्वभूमीवर *समस्त गवळी विकास संस्था (SGVS)* ची स्थापना करण्यात आली.
ही संस्था कोणत्याही व्यक्तिवादी दृष्टिकोनातून नव्हे, तर समाजाच्या सामूहिक हितासाठी, संघटित कृतीसाठी आणि पारदर्शक कार्यपद्धतीसाठी उभी राहिली आहे.

Optimization Engine Rank

Lorem ipsum dolor sit amet consecte nadipiscing elit

Listen & Engage with Followers

Lorem ipsum dolor sit amet consecte nadipiscing elit

Higher Customer Satisfaction

Lorem ipsum dolor sit amet consecte nadipiscing elit

Our Vision & Mission (आमचा दृष्टीकोन आणि ध्येय):

SGVS च्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील समस्त गवळी समाजात सामाजिक जागृती, सामाजिक सुधारणा आणि संघटना बांधणी करून समस्त गवळी समाजाला व्यसनमुक्त, अंधश्रद्धामुक्त, आत्मविश्वासी आणि सशक्त समाज घडविणे. शिक्षित, संघटित व स्वावलंबी गवळी समाज निर्माण करणे — हेच आमचे ध्येय.

Our Mission – आमचे ध्येय:

समस्त गवळी समाजासाठी उच्चशिक्षण, रोजगार, स्वावलंबन, महिला सक्षमीकरण, शेती–दुग्धविकास आणि सर्वांगीण सामाजिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणे. ही संस्था भावनिक एकात्मता आणि सामाजिक जबाबदारी यावर आधारित कार्य करते.

आमचे नेतृत्व (Our Leadership):

SGVS च्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये सर्व १६ हे पदाधिकारी हे विविध जिल्ह्यांतून निवडलेले राज्य प्रतिनिधी आहेत. त्यांचे मनोगत, विचार आणि प्रेरणा वेबसाइटवर स्वतंत्र लिंक स्वरूपात (Leadership Section) उपलब्ध आहेत. *SGVS विश्वास ठेवते की* नेतृत्व हे व्यक्तीचे नव्हे, विचारांचे प्रतिनिधित्व करते. प्रत्येक पदाधिकारी हा समाजाच्या विकासाच्या प्रवासातील एक दुवा आहे. निष्कर्ष: “SGVS” ही संघटित विचारांची, पारदर्शक कामकाजाची आणि लोकशाही पद्धतीची प्रतीक आहे.

Our Awards

hi

संस्थापक अध्यक्षांचे अनुभव (Inspiration behind SGVS)

सन १९९३ मध्ये मी, अकोला वरून यवतमाळ येथे कनिष्ठ अभियंता या पदावर बदलीवर आलो तेव्हा समाजाविषयीची माझी माहिती मर्यादित होती. मात्र, स्थानिक “वीरशैवी लिंगायत गवळी समाज मंडळ” आणि पूर्वाश्रमीच्या “महाराष्ट्र गवळी समाज” या संघटनेत कार्य करताना संघटनशक्तीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवलं.
समाजातील तरुण शिक्षणापासून दूर जात असल्याने, आरक्षणाची गरज प्रकर्षाने जाणवली. अभियंता पदावर असूनही मी घरादारावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी झपाटल्यागत काम सुरू केले.
तेव्हा अनेकांनी “अशोक भाले आरक्षण मिळवून देईल” या विधानाकडे उपहासाने पाहिले; परंतु मी हार मानली नाही.
२००४ मध्ये अखेर समाजाला आरक्षण मिळाले. नंतर मी स्वेच्छेने संघटनेपासून बारा वर्षे इतका प्रदीर्घ काळ दूर राहिलो,याच काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले,अनेक कटू अनुभव आलेत,समाजकार्यात मोठ्या प्रमाणात राजकारणाचा शिरकाव झाल्याने सामाजिक हितापेक्षा स्वतःच्या हिताला जपणे प्राथमिकता बनली आणि या सर्वांचा परिपाक म्हणजेच सन २०२४ मध्ये राज्यातील समविचारी समाजघटकांनी पुन्हा एकत्रित नेतृत्व निर्माण करण्यासाठी GSKS नंतर SGVS ची स्थापना केली.

Our Process

Our Objectives – आमची उद्दिष्टे:

समस्त गवळी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य ” स्थापनेमागील प्रमुख उद्देश म्हणजे-

1. समस्त गवळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक अराजकीय, नोंदणीकृत आणि पारदर्शक व्यासपीठ तयार करणे.

2. अनिष्ट रुढी–परंपरा, आपसी मतभेद व निवडणुकीच्या राजकारणाने निर्माण झालेल्या आपसी द्वेषाचे निर्मूलन करणे.

3. समाजातील युवक–युवतींसाठी परिचय मेळावे व सामुदायिक विवाह उपक्रम राबविणे.

4. समाजजागृतीपर कार्यशाळा, शिबिरे आणि प्रबोधन कार्यक्रम आयोजित करणे.

5. रोजगार, उद्योग, शेती, दुग्धविकास, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे.

6. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व उपक्रम सातत्याने राबविणे.

Why Choose Us

पुढील प्रमुख कार्यक्षेत्रे:

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation

शैक्षणिक प्रगती:

समाजातील गरजू/होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व मार्गदर्शनासाठी सुविधा उपलब्ध करून देणे.

आर्थिक विकास:

रोजगारनिर्मिती, उद्योगविकास आणि दुग्ध व्यवसायाचे सशक्तिकरण करणे.

सांस्कृतिक जतन:

समस्त गवळी समाजाची भाषा, संस्कृती आणि परंपरा जपणे.

सामाजिक समरसता:

एकता, बंधुत्व आणि परस्पर सहकार्य वाढविणे.

आरोग्य व जीवनमान सुधारणा:

आरोग्य सेवा, जनजागृती आणि रक्तदान शिबिरे आयोजित करणे.

सामाजिक न्याय व हक्कांची माहिती:

शासकीय योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचविणे आणि हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे.

SGVS संघटनात्मक रचना: (Organizational Structure)

कोणत्याही नोंदणीकृत संस्थेत संरचना ही “Part to Whole” पद्धतीची असते.
*SGVS ने* या लोकशाही तत्त्वावर आधारित रचना स्वीकारली आहे:
** सर्वप्रथम राज्यभर ऑनलाईन पद्धतीने सभासद नोंदणी करणे.
** प्रत्येक गावातील नोंदणीकृत सभासदांमधून ग्राम कार्यकारिणी निवड करणे.
** त्याचप्रमाणे तहसील, जिल्हा आणि विभागीय कार्यकारिणी आमसभेतून बहुमताने निवडणे.
** प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रतिनिधी प्रदेश कार्यकारिणीवर पाठविणे.
** SGVS प्रदेश कार्यकारिणीला एकूण सदस्य संख्येच्या किमान १०% पर्यंत नामनिर्देशित सदस्य घेण्याचा अधिकार.
*SGVS विश्वास ठेवते की* या संघटनेतील प्रत्येक स्तर हा सेवेचा, समर्पणाचा आणि जबाबदारीचा भाग आहे.

महिला सक्षमीकरण: (Women Empowerment)

SGVS महिला विभाग हा संस्थेचा एक मजबूत स्तंभ आहे.
महिला सदस्यांना नेतृत्व, शिक्षण, उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी प्रशिक्षण देणे हे आमचे ध्येय आहे.
महिला सक्षमीकरणासाठी शिबिरे, मार्गदर्शन कार्यक्रम, स्वावलंबन प्रकल्प आणि आरोग्य जागृती मोहिमा चालविण्यात येतात.
समाजातील महिलांचा सहभाग वाढवून समाजातील खरी शक्ती — आई, बहीण आणि कन्या — यांना प्रतिष्ठा देणे हेसुद्धा आमचे एक उद्दिष्ट आहे.
*निष्कर्ष:*
“SGVS ही एका व्यक्तीची नव्हे, तर एका सामाजिक विचाराची चळवळ आहे.”
शिक्षण, संघटन आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीवर आधारित ही संस्था “समाज जागृती, सामाजिक सुधारणा आणि संघटना बांधणी” करून समस्त गवळी समाजाला नवसंजीवनी देईल — हीच आमची श्रद्धा….. *जय श्रीकृष्ण…!!!*

Our Team

Meet With Expert Team

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua

Melisa Goff

Marketing Expert

Adem Chaer

CEO Socialzy

Brodie Perez

Marketing Expert