“महाराष्ट्र भारतातील भटक्या जमाती प्रवर्गातील सध्या ‘गवळी’ या प्रमुख जातीच्या सर्व उपजातींसह समस्त गवळी समाजामध्ये सामाजिक जागृती करून सामाजिक सुधारणा घडवून आणणे, अनिष्ट रूढी-परंपरा नष्ट करून संस्कृती जतन करणे, आपसी सामंजस्य टिकवून गटबाजी, हेवेदावे, व्यसनाधिनता दूर करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणे हेच माझे उद्दिष्ट राहील.”
समाजाचा सर्वांगीण विकास साधत, जिवन कौशल्ये व जिवन मूल्ये वृद्धिंगत करत वैश्विक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे
गवळी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सामाजिक संस्था हे एक प्रभावी माध्यम आहे. समस्त गवळी विकास संस्था ही संस्था सामाजिक मूल्यांची जपणूक करणारी, समाजातील सांस्कृतिक वारसा टिकवण्यास कटिबद्ध आहे. आजच्या यांत्रिक युगात पारंपरिक लोककला, लोकनृत्य, लोकगीते या कला आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहेत. या कलांचा गौरव करणे, त्यांना नवसंजीवनी देणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.
समाजसेवा करतांना कुठल्याही प्रकारचे राजकारण मध्ये येऊ न देता,प्रदर्शकता ठेवून समाज सेवा करणारी एक आदर्श समाज संघटना असावी हा उद्येश ठेवूनच "समस्त गवळी विकास संस्था"या संघटनेची स्थापना केलेली असल्यामुळे जास्तीत जास्त समाज बांधवानी संघटनेशी जुडून समाज कार्यात हातभार लावावा अशी विनंति करतो
“समाजातील कार्यकर्त्यांना जोडून SGVS चे संघटन मजबूत करणे हे माझे ध्येय आहे. मी ‘गोपाल’ प्रशी शासन दरबारी इंजी. अशोक भाले, इंजी. मदन साखरकर यांच्या नेतृत्त्वात तसेच श्री. गलाट गुरुजी, श्री. प्रभाकर देशमुख व अनेक समाजबांधव यांच्या मार्गदर्शनात सन २०१४ मध्ये गोपाल – गवळी, गवळी – गोपाल जी. आर. काढण्यात यशस्वी झालो.”
"समस्त गवळी विकास संस्था" अपनी सामाजिक जिम्मेदारी को समझते हुवे गवळी समाज एवम उसकी समस्त उपजातियों के पूर्णविकास के लिए कटिबद्ध हैं। हमारा उद्देश्य यही हैं कि जिस समाज में हमने जन्म लिया,उस समाज के लिए कुछ करे,जिससे समाज का हित हो।
Lorem ipsum dolor sit amet, consec adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore
मेळघाट सारख्या महाराष्ट्रातील वंचित गवळी समाज घटकांना उचित सोई-सुविधा, पेसा अंतर्गत आरक्षण, रोजगार आदी बाबींवर लक्ष पुरवून त्याचा पाठपुरावा SGVS च्या माध्यमातून करण्याचा माझा मानस आहे. महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित क्षेत्रातील गवळी समाजाला संघटित करण्यासाठीही मी कटिबद्ध आहे.
गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व दुर्गम, आदिवासी भागातील वंचित बहुजन तरुण–तरुणींना SGVS च्या माध्यमातून व्यापक प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न असेल.”
समस्त गवळी समाजाला SGVS च्या माध्यमातून प्रगतीची दिशा मिळवून देणे हे माझे उद्दिष्ट आहे. तसेच समाजातील उपवर–उपवधू यांना सुयोग्य जीवनसाथी मिळावा यासाठी SGVS च्या पहिल्या राज्यस्तरीय ‘डिजिटल पुस्तिका’ व परिचय मेळाव्याद्वारे समन्वय साधून सामाजिक सुधारणा करण्याचा मी प्रयत्नशील राहीन.
समाजातील महिलांना संघटित करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणे हे माझे ध्येय आहे. SGVS च्या सशक्त अशा सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून महाराष्ट्रातील समस्त महिलांना संघटित करण्यासाठी व महिला तसेच बाल कल्याणासाठी व्यापक प्रयत्न करणार असल्याची मी ग्वाही देते.
SGVS च्या प्रत्येक उपक्रमाला योग्य प्रसिद्धी मिळवून देणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. समस्त गवळी समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांचे निर्मूलन करून व्यापक संस्कृती व विचार यांची जोपासना करून SGVS च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुण वर्गाला संघटित करण्याचा प्रयत्न करणार आहे.
“SGVS चे जाळे अधिकाधिक विस्तारून प्रत्येक समाजबांधवापर्यंत पोहोचवणे हे माझे ध्येय आहे. महाराष्ट्रभरातील समस्त गवळी समाजाला SGVS च्या माध्यमातून संघटित करण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे.”
“संस्थेच्या आर्थिक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडून SGVS ला सक्षम बनवणे हे माझे ध्येय आहे. यासोबतच कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक अडचणी SGVS च्या माध्यमातून शासनासमोर मांडून त्याचे निराकरण करण्यात व्यापक प्रयत्न करणार आहे.”
समस्त गवळी विकास संस्था ही पूर्णपणे अराजकीय संघटना असेल व गवळी समाजातील सर्व शाखांमध्ये एकोपा निर्माण करून समाजामध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी संघटना कार्यरत राहील. अत्यल्प शिक्षणाचे प्रमाण व भौगोलिक विखुरलेपणा यामुळे या समाजाला अनेक समस्या भेडसावत आहेत. संघटनेच्या स्तरावर वैचारिक आदान प्रदान होऊन समस्त गवळी समाजाच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करून समाजाला विकासाच्या मार्गावर नेण्याच्या प्रयत्नामध्ये मी माझ्या कुवतीनुसार प्रयत्न करील. "United we stand, divided we fall " या म्हणीप्रमाणे सर्वांनी संघटनेला सदस्य नोंदणी द्वारे जोडून घ्यावे व संघटनेला सहकार्य करावे अशी मी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती करतो.
“SGVS च्या संघटनात्मक कार्याला गती देऊन युवकांमध्ये जागृती निर्माण करणे हे माझे ध्येय आहे. याप्रमाणेच SGVS च्या आस्थापनाच्या कामात प्रदेश अध्यक्ष तसेच प्रदेश सरचिटणीस यांना सुयोग्य सहकार्य करून SGVS च्या रास्त मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करीन. तसेच माझे वडील स्व. नारायणराव गवळी यांनी सामाजिक सुधारणा करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना SGVS च्या माध्यमातून साकार करून पुढे नेण्याचा माझा मानस आहे.”
Lorem ipsum dolor sit amet, consec adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore
Lorem ipsum dolor sit amet, consec adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore




